शिरूर हवेलीत अशोक पवार यांना जनतेचा वाढता पाठिंबा!
थेऊर ( प्रतिनिधी) सुदर्शन दरेकर
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून अशोक पवार यांच्या गाव भेट दौऱ्यास हवेली तालुक्यातील वडू बुद्रुक येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर पुष्प चक्र अर्पण करून प्रचाराची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांताराम कटके यांनी अशोक पवार यांच्याबरोबर प्रचारात सहभागी होऊन आपण हवेली तालुक्यातील प्रत्येक गावात अशोक पवार यांचा प्रचार करणार असल्याचे कटके यांनी सांगितले. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून, विद्यमान आमदार अशोक पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे व शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने मला विजयाची खात्री आहे असे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पुणे नगर रोडवरील वाहतूक समस्या ही प्राधान्याने सोडवण्यात येणार असून येत्या काळात शिरूर हवेलीतील जनता स्वाभिमानाच्या पाठीमागे उभी राहील याची मला खात्री आहे. प्रत्येक गावात जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून हवेलीतील जनता माझ्यामागे उभी राहील अशी मला खात्री आहे असे मनोगत व्यक्त केले.
